एकाकी
एकाकी
1 min
265
नीरव शांत तळ्याकाठी
मी बसलेले एकटेपणा लेवून..
शांतता भंग करणारा तो
मनीचा प्रचंड कोलाहल घेऊन...
बदलणारे माणसांचे रंग
आयुष्यच बेरंग करणारे...
शून्य नजर केली तरी
वारंवार समोरी येणारे...
ओसरणाऱ्या तळ्याच्या पाण्यासारखा
होणारा जीवाचा ऱ्हास...
गळून पडलेले ते झाड
आयुष्या सारखेच भकास....
विश्वासाला सहज गालबोट
लावून गेलेले कित्येक जण...
सोसवलेल्या जीवनाला लागलेलं
दुःखाचं जणू विरजण....
सुन्न पडलेले हृदय ते
पार सुकून गेलेल्या अश्रुधारा...
एकटेपणाला कवटाळलेल्या माझ्या
सोबतीला फक्त घोंघवणारा वारा....
कधीतरी पुन्हा पालवी फुटेल
नी पाणीही ओसंडून वाहेल...
पण मी मात्र तशीच वादळ घेऊन
तळ्याकाठी शांत बसलेली.... अजूनही......
