अव्यक्तपणे व्यक्त होताना...
अव्यक्तपणे व्यक्त होताना...
1 min
679
ठरवलं मनाशी पक्की खूणगाठ
बांधूनच आज निघायचं ..
भले मग काहीही होवो
आज तुला सगळं सांगायचं ......
अडकलेले श्वास सारे
मोकळे तुझ्या समोर करायचे ..
कोंडलेले शब्द कैक
तुझ्यासाठीच गुंफायचे ......
बांध फुटावा मग अश्रूंचा
स्वैर त्यांना वाहू द्यावे ..
नजरेत कैद भावना पाखरू
मुक्तछंद विहरू द्यावे ......
न जाणो खर तू समोर येताच
गोंधळाच्या लहरी उठतात ..
सर्व काही ठरवूनही
शब्द ओठांवरच विरतात ......
अबोल जरी राहिले मी
मन तुझ्याच रंगी रंगत आहे ..
नजरेतूनच सारे उमजेल सारे
सदैव याचीच वाट पाहत आहे ........
