STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Others

4  

Vishal patil Verulkar

Others

दोन थेंब जीवनाचे

दोन थेंब जीवनाचे

1 min
355

दोन दोन थेंबाले आज लय किमया हाय,

लय जन पाजून रायले पोलिओ डोस व माय...


लेकरईच्या हाता पायाच्या होऊ नई काळ्या,

म्हनुन ठिवला व्हता कार्यकरम म्हने तो शेजारचा बाळ्या...


डोस पाजला की पोरं टनटन व्हतात या दोन थेंबापासून,

नई पाजलं त सागा कसे वाचल त्या कुपोषित रोगापासून...


नेल लायन्या पोट्याले शाळेत, देल्ला त्याले डोस,

लायन्याले पाऊन इज्या लळ्याले लागला तथुलच्या डाक्टरईले पाउन गेले त्याचे होस...


ठिवलं टेबलावर इज्याचे धरले दोनी हात पाय,

लळत - लळत म्हने मले औउषीद नई पियाच माय...


लळून लळून इज्या इज्या गायावया झाला य,

हे पाऊन शांत्याचा पोरगा औउषीद गप गुमान पेला...


समद्या गावात फिरले डाक्टर लोक, काळ्ळी तैन फेरी,

जाऊन दोन दोन थेम पाजले लेकरईले घरोघरी...


आता तुमीच ईचार करा, पोलिओले किती किमया हाय,

कोनाचे लेकरं रायले अस्तील त शाळेत घिऊन जाय...


तथीच दोन दोन थेंबाचा कार्यकरम चालू हाय,

ते दोन थेंब बी सगळेईले फुकटातच हाय...


Rate this content
Log in