दिवस शाळेचे
दिवस शाळेचे
1 min
228
सकाळी सातच्या ठोक्याला
सर्वत्र गडबड असायची।
आम्हा मुलांच्या दिवसाला
शाळेच्या गणवेशानेच सुरुवात व्हायची।।१।।
मुलांच्या गंमतीजंमतीने
सारी शाळा दुमदुमायची।
स्पीकरवर वाजणाऱ्या राष्ट्रगीतानेच
शाळेची खरी सुरुवात व्हायची।।२।।
तासाला लपून डबा खाण्यातही
वेगळीच मज्जा असायची।
शिक्षकांना ओरडताना पाहण्यातही
एक वेगळीच माया दिसायची।।३।।
कट्ट्यावर गप्पा मारतानाही
एक अनोखी मैफिल जमायची।
आपल्या शाळेचे नाव सांगतानाही
छाती अभिमानाने फुलून यायची।।४।।
आयुष्यात दहावीनंतरचा टप्पा आला
आणि आम्ही शाळेपासून दुरावलो।
अभ्यासानंतर कामाचा ओघ आला
आणि आम्ही शाळेपासून पोरके झालो।।५।।
