दिसे लोकशाही
दिसे लोकशाही
1 min
36
भारतीय नागरिक मी,
नसे अन्य काही।
माझ्यासाठी देशच माझा,
असे सर्व काही।।
स्वातंत्र्यास्तव या देशाच्या,
समर्पित जिवन।
अबाधीत या स्वातंत्र्यात,
वसे दिशा दाही।।
समान संधी प्रत्येकाला,
समतेचे सुत्र।
अवलंबा हे प्रत्यक्षात,
नसे त्रास काही।।
बंधुत्वाच्या व्यवहाराने,
समाज हा घडतो।
एकत्वाच्या भावाने मग,
सुखी सर्व राही।।
न्याय मिळावा प्रत्येकाला,
ईच्छा प्रत्येकाची।
संविधानाच्या दृष्टीने ही,
दिसे लोकशाही।।