STORYMIRROR

chikne brothers

Others

3  

chikne brothers

Others

दिस बुरताना.... (आगरी कविता)

दिस बुरताना.... (आगरी कविता)

1 min
379

दिस बुरताना..माजे गावान,

लाली चरते जशी

मावलतीचे गालाव,

लाल सुरव्याची टिकली 

सोबते तिजे कपालाव,

दिस बुरताना....


दिस बुरताना..माजे गावांन,

मालाव चरनारे

गाई-म्हराचें तोंडान

आराखते गवताचा घास,

गोठ्यान हंबारनारे गोजरांची 

लागते त्यांचे मुके जीवाला आस,

दिस बुरताना...


दिस बुरताना..माजे गावान, 

निरव आभालांन वरती

पाखरांच्या लागतांन रांगा,

कया असते मुक्काम त्यांचा

कया असतान घरुंड,

बगू कोनी सांगा..???

दिस बुरताना....


दिस बुरताना..माजे गावांन,

शेतावला गरी

घरांकर निंगताना

खांदारी मरते 

फावरा-कुदली,

धापा टाकीत येऊन 

माय-मावली

पोराला घलते पदराखाली,

दिस बुरताना....


दिस बुरताना..माजे गावांन,

सासुरकरनीचे जीवाची  

कवरी व्हते घालमेल.?

वांटकर लागतांन डोल तीज

कवा भरतार माजा घरा येल.?

दिस बुरताना.....


दिस बुरताना..माजे गावांन,

देवाचे पुरं पेटतांन

लामनदिव्यांच्या वाती,

कच्ची-बच्ची बोलतान म

बोबरे बोलांन 'शुभंकरोती'

दिस बुरताना.....


दिस बुरताना..माजे गावांन,

शेवटी इसाम्याला

घरांची मानसा थकून-भागून,

येके छपराखाली 

येतान,

भईष्याचे उजेराची

सपना मंग

रातीचे कालोखान बगतान...

रातीचे काळोखान बगतांन..

दिस बुरताना....


Rate this content
Log in