धीर
धीर
1 min
330
दोन जीवांचे मेळ घडले
सुखी होता संसार
हसता 'खेळता डाव मोडला
क्षणात दुःख कोसळले फार...
संसाराच्या वेलीवर
दोन हसरी फुले
त्या फुलांना पाहता
मन आनंदून गेले...
नको देवा मरण आता
जगायचे आहे फार
दोन हसरी फुलांसाठी
दे देवा थोडा धीर...
