आठवण
आठवण
1 min
294
नको रे असा दूर जाऊ
वाट तुझी रे बघते
एकांतात बसून तुझ्या आठवणी
हृदयात काहूर दाटते...
तुझ्या प्रीतीत रे अशी
बावरी रे झाली
नको असा दुरावा
घे न जरा जवळी...
नयन रे हे थकले
वाट तुझी रे पाहते
अश्रूंना झाली वाट मोकळी
आठवणीत तुझ्या रे मी जगते...
