STORYMIRROR

Swini Deshpande

Others

3  

Swini Deshpande

Others

चूक

चूक

1 min
302

क्षणभरातल्या कणभर चुकीसाठी 

आभाळाएवढी सजा असते

चुकीमधून शिकण्याची वेेगळीच 

काहीतरी मजा असते

किंचितशा चुकीमूळे तुुटतात

रक्ताची नाती

आयुष्यभर लागते साडेसाती 

नि चूक कळते अंतीं

चुकीसाठी आयुष्य आहे

नि आयुष्यासाठी चूक आहे

चुकीमधून शिकण्याची 

हेच खरं सुुुख आहे

अखेर हे सार होत असतं

केवळ आपल्या भल्यासाठी 

आपण मात्र चुकत असतो 

नवीन काहीतरी शिकण्यासाठी


Rate this content
Log in

More marathi poem from Swini Deshpande