बंध मैत्रीचे
बंध मैत्रीचे
महिना होता मार्च, दहावीच्या परीक्षेचा।
वर्षभराच्या मेहनतीचे हक्काचे फळ मिळवण्याचा।।
मेंदू मात्र परीक्षेच्या नादात होता ।
प्रश्नपत्राच्या उत्तरांचा बेत रचत होता ।।
मात्र हृदय हे भावनांनी भरून गेलेलं ।
कारण अस्तित्वातल सत्य त्यानी आधीच गवसलेलं ।।
भीती होती, मनात आलेल्या त्या विचाराची।
कालांतराने वाढत जाणाऱ्या मैत्रीमधल्या अंतराची।।
काही वर्षा आधी या मैत्रीचं रोप उगवलेलं ।
एक नवीन आपुलकीच नातं जोपासलेलं।।
प्रत्येक सुखदुःखात आम्ही एकत्र असायचो।
मस्तीमध्ये तर पुढाकाराने साथ द्यायचो।।
अवचितपणे मैत्रीचे धागे आम्ही गुंफत होतो।
एकमेकांमधला विश्वास आम्ही जोपासत होतो।।
वेळ काशी चाहूल न लागू देता निघून गेली।
नीट निरोप देण्याची संधी सुद्धा नाही दिली।।
अजूनही ते चेहरे आठवतात, जे खूप हसवायचे।
आणि स्वतःच्या मजेची बिनधास्त चिडवायचे।।
राग तर कधी कधी सगळ्यांनाच यायचा।
पण, मैत्रीच्या प्रेमापोटी तो सुद्धा नमायचा।।
उणीव तर आताही जाणवते त्या हास्यमय क्षणांची ।
परिपूर्ण करण्यासाठी आठवण येते जवळच्या मित्रांची ।।
या प्रवासाला आता काळ उलटलाय।
बाहेरचा नजराही बराचसा पालटलाय।।
जरी एक प्रवास सुटला तरी दुसरा वाट बघतोय।
परत आनंद भरण्यासाठी सुखाचे क्षण वेचतोय।।
जुने सोबती सुद्धा भेटतील आयुष्याच्या या वाटेमध्ये।
नवे सुद्धा जागा बनवतील या हलक्या फुलक्या हृदयामध्ये।।
भरारी कितीही उंच असो
गरज आहे मैत्रीची।
कारण यशाचा अर्थ अपूर्ण आहे
जर साथ नसेल माझ्या मित्रांची।।
