बळीराजाचा नांगर
बळीराजाचा नांगर
शाळा बंद, ऑफिस बंद
दुकाने बंद, कारखाने बंद
कोरोनाच्या भीतीने
धंदे सारे झालेत मंद...
कोरोना ने सिद्ध केलंय
जगात बंद पडेल सारे काही
मात्र बळीराजाचा नांगर
अखंड चालत राहील...
बंद घरात माणसांना
बळीराजानेच जगविले आहे
भाज्या फळे फुले धान्य
सारं काही पुरविले आहे
आणि हे पुरविताना
मातीत अखंड
राबत राहिलेत त्याचे कणखर हात...
आज कोरोनामुळे
माणसे होत आहेत कॉरन्टाईन
पण इथं दरवर्षी या कोरोनासारखे
नवनवीन विषाणू येऊन राहतात वावरात
लाल्या, बोंडअळी, आणखीन बरेच काही
औषधांचा डोसांना सुद्धा मानत नाहीत ..
मगं वावराला कसं करावं कॉरन्टाईन..
हे त्याला कळत नाही
आणि लढतच राहतो
दुष्काळ, अतिवृष्टी,नापिकी यांच्याशी
पिढ्यानपिढ्या....
कोरोना तू जगाला विळख्यात घेशील
पण दरवर्षी संकटाना तोंड द्यायची
सवयच असलेला माझा बळीराजा
तुला घाबरणार नाही..
कारण त्याचाजवळ नांगर आहे
