बिजांकुरास आमुच्या...
बिजांकुरास आमुच्या...
पुत्र असो वा पुत्री लहान, मातृपित्याचे हृदय महान
बाळांनो ऐका आमुची तहान .....
भक्त पुंडलिक सम मम अंकुरांना कोंमलोत्तम
आशीर्वाद तुम्हा जीवनी, उत्तमेत्तमा।
आपुले शब्द जरी येता न कानी।
वेग पावतो आमुचे हृदय करी चाकरी
तयांचे स्मरण होत, वंदतो आम्ही आत्मीयतेने।
बर्फ़ासम अन्य सांगा, कोणता पदार्थ।
वितळावे नाही लागत बर्फ हाची तयाचा मतीतार्थ।
जागृती स्वप्नी स्थिरावे, स्वतः च विरघळत।
नाही तया विरघळन्या मंत्रोच्चार लागत।
नाही तया विरघळन्या लागत अन्य आघात।
पुत्र वा पुत्री लागी प्रेम चिरायू मातापित्यांचे जीवनात।
त्रिकाल राहतो बर्फापोटी, सर्वाना थंडावा।
अखंड असतो ह्रदयी आमुच्या त्याचा ओलावा।
तद्वत तुम्हासाठी बदलतो क्षणोक्षणी आकार।
आमुच्या प्रेमा उपमा तयाची, तेथे नसे अंधः कार।
बिजाअंकुरास्तव, आमुचे जीवन गाने।
अन्न, वस्त्र, निवारा हेच आमुचे लेणे।
इच्छा नाही कसली आता, करण्या मौज मजेने।
पुन्हा सांगतो, आमुचे जीवन गाणे, आमुचे हे गाणे।
शेवटचे हे घरटे तुमचे दारी, तुम्हासाठी जगणे।
शपथ सांगतो चार करांनी तुम्हा साठीचं जगणे।