बहिणीची माया
बहिणीची माया
1 min
238
बहिणीची माया जशी
घनदाट झाडाची छाया
शीतल, आल्हाददायक
हवीहवीशी सुखकारक
कधीं सखी म्हणुन
तर कधी बहिण म्हणुन
मनांतिल गुपिते उलगडणारी
वेळोवेळी सावरून घेणारी
ओठांवर हास्य, चेहेऱ्यावर आंनद
मनात भरभरुन प्रेम साठवुन
कुटुंबांचं हित जपणारी
बहिणीची माया न्यारी
किती झटांव तिने आपल्यांकरिता
निस्वार्थी पणे मन जिंकणयाकरिता
स्वतःच्या जीवाची परवाह न करता
फक्त आशीर्वचन मिळवण्याकरिता
तिची महती शब्दांत न
मांडता येणारि
तिची आठवण मनांतुन
कधीही न जाणारी
डोळ्यांच्या कडा ओलावणारी
जीव ओवाळून टाकणारी
बहिणीची माया
मनांत कायम राहणारी
