भावना
भावना
1 min
266
बुडालेले घर पाहिले
मन माझे जळाले
पाण्यात आशा वाहिल्या
स्वप्नं अधुरे राहिले
भावना मुक्या झाल्या
डोळ्यात ऊभ्या राहिल्या
शब्द फुटेना तोंडातुन
वेदना बनून वाहिल्या
वाहुन गेला संसार
पोटात भुक ऊठली
गोठले दूध अंगातले
सोनुली आज रडली
गेले शेत सारे
मेली सारी जनावरे
धनी बघत राहाला
डोळे कोरडे झाले
डोळ्यात उरलेले अश्रू
भावना अबोल झाल्या
नाही राहिले शब्द
पुरात फक्त हसल्या
