भारत देश माझा
भारत देश माझा
1 min
232
फडकला समतेचा तिरंगा
कित्येक शहीदांच्या बलिदानाने
भारत माझा स्वातंत्र्य झाला
क्रांतिकारकाच्या रक्ताने
राज्यघटनेचा बाळगू अभिमान
एक मुखाने सारेजण बोलू या
भारत माझा देश महान
भारत माझा देश महान ..
करू जल्लोष स्वातंत्र्याचा
गर्व करूया भारत देशाचा
इतिहास ठेवल्या आपल्या विचारात
तिरंगाच घेवुन आपल्या हातात
गावू या सारेच जगी राष्ट्रगीत
वंदे मातरम बोलू या एक मित
सुजलाम सुफलाम देश होवो
स्वातंत्र्य दिन चिरायु होवो
