आठवण
आठवण
1 min
240
निघुन गेली माझ्या आयुष्यातुन तू कधीच
तरीही तुझे नाव ओठी येते आज माझ्या
आजही तुझे भास कवळतात मला
आजही तुझ्या आठवणी हृदयात माझ्या
तुझ्या आशेत गेली ही जिंदगी सारी
आजही तुला शोधतो मी या जीवनात माझ्या
तुझा शब्द शब्द तसाच आहे मनात
आजही तुझा चेहरा दिसतो अंतकरणात माझ्या
खोटेच निघाले हे भविष्या माझे
आजही तुला मागतो मी नशिबाला माझ्या
सांगु कुणाला कित्येक जखमा उरातल्या
तुझ्या आठवणीतले आसवं दिसतात फक्त एकांताला माझ्या
नाही भेटले तुझे प्रेम या जीवनात मला
हजार तुझ्या आठवणी पडल्या झोळीत माझ्या
