बदलेला पाऊस...
बदलेला पाऊस...
1 min
284
आता त्या पावसाने जणू रिमझिम बरसणंच सोडून दिलं आहे.
कारण आता फक्त जोरदार कोसळणं इतकंच काय ते त्याला कळू लागलं आहे.
आता तो पाऊस जणू कधीतरी होणाऱ्या भेटींची गंमत विसरला आहे.
कारण आता फक्त बेभान होऊन येणं हे त्याच्यासाठी रोजचं झालं आहे.
आता हळूवारपणे चिंब करणारा तो पाऊस कुठेतरी हरवत चालला आहे.
कारण आता फक्त चार भिंतीना ओल करण्यामध्येच तो पाऊस रमत आहे.
