STORYMIRROR

Namrata Mangrule

Others

3  

Namrata Mangrule

Others

बालपण

बालपण

1 min
383

बालपण म्हणजे

आईच्या हातचा खाल्लेला 

प्रेमाचा मार

तर बाबांवर टाकलेला

हट्टांचा भार


बालपण म्हणजे

आजी च्या मांडीवर झोपून

ऐकलेल्या परींची कहाणी

तर आजोबांकडून ऐकलेल्या

त्यांच्या लहानपणींची आठवणी


बालपण म्हणजे

दादाच्या गाडी वरचा

पहीला प्रवास

तर ताई सोबत

घालवलेला तो सहवास


बालपण म्हणजे

चाळीत खेळता खेळता

केलेली हाणामारी

तर मधल्या सुट्टीत एकत्र

डब्बा खाल्लेली ती यारी


बालपण म्हणजे

सुंदर आठवण

तर सगळ्यांच्या जीवनातला 

आनंदाचा क्षण


Rate this content
Log in