STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Others

3  

Vishal patil Verulkar

Others

बालपण चारोळी

बालपण चारोळी

1 min
3.0K


हरवले क्षण येतील का पुन्हा

उगाच मोठे होऊन वाटत आहे गुन्हा,

चला आज पुन्हा जगुया बालपनात

खेळ खेळू भातुकलीचा कोवळ्या उन्हात!!


बलपणात रमतांना

खोळण्याचा सहारा होता

जसे जसे मोठे होत गेलो

लहनपनांच्या मित्राचा दुरावा होता!


आज का वाटे पुन्हा लहान व्हावे

सोबतीला पुन्हा जुने मित्र असावे,

कागदाची नाव घेऊन पावसात जावे

पुन्हा एेकदा बालक होऊ खुप खुप खेळावे!!


खेळणेयाचे गेले ते दिवस

राहिल्या त्या आठवणी,

आता आठवले बालपण तर

येते फक्त डोळ्यात पाणी!!


चला आज बलपणात जाऊ

थोडसं हसु थोडसं रुसू ,

आई ओरडल्यावर मात्र

रडत रडत कोपऱ्यात बसू!!


पाठीवर दप्तर ,हातात होती पाटी

शाळेत गेल्यावर मास्तरची दिसे काठी,

बे एक बे नाहीच आले तर मास्तर

मारुन मारुन हात चपाती सारखे लाटी


चारोळ्याची मैफील

सजली आज बालपणात,

मला आनंद मावेनासा झाला

या शब्दशृंगार गगणात!!



Rate this content
Log in