बाळाची चाहूल
बाळाची चाहूल
1 min
1.2K
येणाऱ्या बाळाची लागली चाहूल,
आंबुलकरांच्या वंशाचं एक पुढे पडलं पाऊल ।।
मनातला आनंद गगनावरी गेला,
सूर्य उगवला पण चंद्र नाही मावळला ।।
जमीन म्हणे छताला खबर आहे नामी,
लवकरच येणार आहे आपला छोटासा स्वामी ।।
मधुमास असला तरी वृक्षांना आला बहर,
फांदिमागुन येती कोकिळेचे मधुर स्वर ।।
पाना पाना मागून डोकावती कोवळ्या कळ्या,
काय झाले काय झाले एकमेकींना विचारू लागल्या ।।
फुलला आसमंत वारे सुगंधित शितोष्ण,
वासंती तुझ्या घरी येणार आहे बाळकृष्ण ।।
अलका आजी उठ आता चल लाग कामाला,
मी आहे ना इथे तुझे कौतुक बघायला, आशीर्वाद द्यायला ।।
