आमची आजी
आमची आजी
जिथे कुठे असशील ऐक बरं का आजी,
कारण आता तुला फोन करता येणार नाही ।।
पानावर नाही उतरवलं तुला, पण मनात कायमचं ठेवलं,
आजी, तू आयुष्यातून निघून गेलीस आणि आमचं मन पाणावलं ।।
स्वच्छतेचं वेड तुला, काळजी तू स्वतःची घेतलीस,
सुंदर आणि प्रेमळ होतीस तू, म्हणून का परमेश्वराला आवडलीस ? ।।
आमची आजी होती खूप हुशार,
कणखर आणि स्पष्ट होते तिचे विचार ।।
श्री रामनाम सदैव तिच्या मुखात असे,
अयोध्या ही आपलीच मग कोर्ट केस कशाला असे?
(महायुद्धाच्या काळातला जन्म होता ना तिचा 👆)
आपली मातृभूमी आपले लोक, आपले सैनिक अशी ती होती देशभक्त,
पृथ्वीवर श्रीराम श्रीकृष्णासारखं कुणी नाही,
असे म्हणणारी ती खरी देवाची भक्त ।।
तरुण भारत तिचा मित्र, आसमंत तिची सखी,
पूर्ण वृत्तपत्र वाचे आणि कोडे सोडवण्यात होती ती एकदम पक्की ।।
संस्कृतचे अफाट सागर तुझ्यात कसे गं समावलेस,
छान छान श्लोक त्यातून आम्हाला शिकवलेस ।।
चर्चा करावी किती यावर लिमिट कधीच नसे,
आजी तुझे ज्ञान कुठेच कमी पडत नसे ।।
मधू, US मध्ये राहून आपली संस्कृती जप बरं,
तीचे म्हणणे आपली संस्कृती सर्वश्रेष्ठ, हेच खरं ।।
जास्त काम करू नकोस, घे स्वतःची काळजी,
असे म्हणणारी तू कुठे गेलीस गं आजी ।।
पुड्यातली खारीक आता पुन्हा नाही भिजणार,
माझ्या डोळ्यांची काळजी आता तू कशी घेणार ।।
सगळ्या नातवांचे कौतुक किती करायची,
पण कौतुकाचे शब्द पडणार कमी, कारण आता त्यांना तूच नाही दिसायची ।।
पणजी आजी कुठे गेली काही सांगता येणार नाही,
त्यामुळे ये पुन्हा आमच्याजवळ आम्ही काही ऐकणार नाही ।।
तब्येतीनी खचलीस तू म्हणून कदाचित गाठली नाही शंभरीची (१००) शिखरे,
या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी होऊ देत तुझी सर्व स्वप्नं खरे ।।
मिळू देत तुला तुझ्याच परमेश्र्वराकडून सुदृढ आणि सशक्त आयुष्याचा आशीर्वाद,
आणि होऊ दे तुझ्या कीर्तीचा सर्वत्र निनाद ।।
तू परमेश्वराला हाक मारलीस, शेवटी त्याने ऐकलंच ना तुझं,
तू जिथे ही जाशील तिथे खूप खूप सुखी राहशिल येवढच म्हणणं आहे माझं ।।
आजी म्हणून कुणाला हाक मारायची?
तूच सांग मला आता ही सवय कशी गं मोडायची ?।।
