STORYMIRROR

मनिषा जाधव(माने)

Others

3  

मनिषा जाधव(माने)

Others

अवखळ मन

अवखळ मन

1 min
28.4K


मन उनाड अवखळ वारा

घेई भरारा

सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर तर

कधी आठवणीच्या घसरगुंडीवर

झोके घेई भराभरा

मन उनाड अवखळ वारा

मन उनाड अवखळ वारा

सुखात उडवी आनंद पिसारा

दुःखात सोडी अश्रुधारा

मन उनाड अवखळ वारा

मन उनाड अवखळ वारा

मन सोनेरी स्वप्नांची दुनिया

स्वैर फिरुनी पाहे दुनिया

मन आकाशीचा तेजस्वी तारा

मन उनाड अवखळ वारा

मन उनाड अवखळ वारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from मनिषा जाधव(माने)