STORYMIRROR

Vinod Mahajan

Others

3  

Vinod Mahajan

Others

अष्टपैलू महाराष्ट्र

अष्टपैलू महाराष्ट्र

1 min
213

निसर्ग अन् कलावंतानी सजवलेला

आहे अष्टपैलू, समृध्द महाराष्ट्र 

भुस्तरीय वैशिष्ट्याने नटलेला

सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्र

 

पश्चिमेस विस्तीर्ण सागरी किनारा

अंगावर मिरवतो दरीखोरे, पर्वतरांगा

वृक्षवल्ली, पशू, पक्षी घेती आसरा

नदी, झ-यातून अविरत वाहे गंगा

 

कपड्यालत्त्याचे मँचेस्टर इथे

निसर्गसंपन्न कँलिफोर्निया वसे

शिक्षणासाठी ऑक्सफर्ड इथे

सिलीकॉन व्हँलीची बुध्दीमत्ता दिसे

 

परशुरामाने वसवली नगरी सागरकिनारी

रामसीतेच्या पदस्पर्शाने झाली पावनभूमी

शिवाजीच्या पराक्रमाची गर्जते ललकारी

देशरक्षणासाठी लढणा-यांची नाही कमी

 

देशाच्या अर्थव्यवस्थेचा आहे कणा

साहित्य, संस्कृतीचा जपे वारसा

सर्वधर्मसमभावाचा शिकवी बाणा

अखिल भारताचा हा जणू आरसा


Rate this content
Log in