अनंत शांतता.......
अनंत शांतता.......
1 min
26.7K
उसळलेल्या लाटांना
होऊ दे भावनांचा मार्ग मोकळा
गगगर्द अंधाराना
भेटू दे सागरातील वादळा
तेंव्हा होईल सुसह्य जगणं
तो पर्यंत...
राहू दे थोडा काळ शांत
तू समोर मी समोर
दुरावलेय मनातील अंतर
समजूनही कधी नाही समजत जे
वेळेला सोडवू दे प्रश्न
तेंव्हा देईल वेळ सर्व उत्तर
तो पर्यंत...
राहू दे थोडा काळ शांत
त्यानं सांगितलं....
काळ हा जाई पुढे
ना त्याच्या हाती हित थांबणं
येईना सोडता नि धरता
ना येई मला क्षणांना बांधता
अन.....न बांधलेल्या गाठी तरीही
पुन्हा पुन्हा त्यांना सोडवणं
का राहायचं थोडा काळ शांत...?
काळ हा लोटला किती जरी ही
मला इथेच तुझं शोधणं
वेळ निघून गेली तरीही
तुझंही तिथेच सापडणं
का....?
तरीही...
कुठपर्यंत... वेळ झाला आहे अनंत
राहणार किती वेळ शांत
जाऊ दे, राहा थोडा काळ शांत
