STORYMIRROR

Apurva Jadhav

Others

4  

Apurva Jadhav

Others

अगं अगं मराठी या महाराष्ट्राची पाहुणी नाही शान आहेस तु

अगं अगं मराठी या महाराष्ट्राची पाहुणी नाही शान आहेस तु

1 min
295

इतिहासाच्या कणखर पानांवर तुझ्या अलगद पावलांचा हळुवार स्पर्श झाला 

आणि तुझे गुणगान गाण्याकरिता तो सह्याद्रीही धावून आला

श्रृंगार रसासमं साज तुझे,वीर रसासमं शौर्य तुझे 

तुझ सौदर्य पाहून तुझ्या प्रेमात पडले हे नेत्र माझे

नेत्र तुझे हे जणु साहित्य मराठी 

पोटभाषा तुझे अनेक 

मालवणी,कोंकणी,अन् वऱ्हाडी

अरे मायलेकी गड्यांनो,हि भाषा नाही अस्मिता आहे आपली 

मग मराठी बोलायला लाजता कश्यासाठी 

उलट गर्वाने म्हणा,'महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी आमची'

इतर भाषांची ओढ कधीच नाही गैर 

अहो,मग मराठी भाषेशीच का करता वैर

अगं अगं मराठी या महाराष्ट्राची पाहुणी नाही शान आहेस तु..........


ओढ लागली माझ्या मनाला तुझ्या त्या मधुर गीतांची 

थेट मनाला स्पर्श करतात हि जादुच तुझ्या शब्दांची

शब्द आहेत तुझे असे काही गमतीशीर 

म्हणूनच अर्थ समजायला होतो थोडासा उशीर

साहित्याचे वरदान तुला देवाने हे दिले 

संतकवींच्या योगदानाने साहित्य मराठी हे अजरामर झाले 

श्रीमंती म्हणावी ती यालाच ना 

हाडाचा मराठी माणूस तोच,आपल्या संस्कृतीचा अभिमान ज्याला 

तुझे कौतुक करत असताना मी जरा दोन शब्द जास्तच बोलते

कारण या महाराष्ट्राची पाहुणी नाही शान आहेस तु 

अगं अगं मराठी या महाराष्ट्राची पाहुणी नाही शान आहेस तु 


ईच्छा माझ्या मनी एकच वसे 

नाव तुझे हे मोठे आसमंती भिडे 

साक्षीदार आहेस तु,या स्वातंत्र्य चळवळीची,

शिवरायांच्या पराक्रमाची,

सावित्रीमाईंनी पेटवलेल्या शिक्षणाच्या क्रांतीज्योताची

कुसुमाग्रजांच्या काव्यप्रेमाची

अगं अगं मराठी या महाराष्ट्राची पाहुणी नाही शान आहेस तु 

या महाराष्ट्राची शान आहेस तु..........


Rate this content
Log in