आयुष्याची वाटचाल......
आयुष्याची वाटचाल......
1 min
428
स्वप्नात पाहिलेले क्षण आज सत्यात झाले साकार
मेहनतीचा रंग मिसळल्याने त्याला मिळाला एक वेगळाच आकार
ज्याने पदरात सुख टाकलं तो तर आहे निराकार
पण निस्वार्थ माया देऊन दाखविला त्याने परोपकार
शोधत होते क्षणो क्षणी,कोण येईल मदतीला धावूनी
अश्रू झाले अनावर,मार्ग मिळेना दुःखावर
अवचित आयुष्यात आली एक सुखाची सर
कोमेजलेल्या रोपट्याला मिळाली फुलांची बहर
मातीच्या सुगंधा प्रमाणे दरवळला सुगंध जीवनात
अपूर्ण स्वप्नाला पूर्णत्व हे मिळाले क्षणात
डोळ्यात तरळले अश्रू ओठावर खुलले हसू
वाटेवरच्या वाटसरूला मार्ग लागले दिसू
खडतर प्रवासातील अडथळे झाले दूर
सुखाची चाहूल लागता मनी दाटले हूर.
