आयुष्य हे असच असतं
आयुष्य हे असच असतं
1 min
440
आयुष्य हे असच असतं
कोणीतरी रडवत असतं,
कोणीतरी हसवत असतं
कोणीतरी समजावत असतं...
पैशांसाठी इथे नेहमीच
सर्वांचा खेळ मांडलेला असतो,
पण प्रेमाने माया देयाला
इथे कोणाला ही वेळ नसतो...
दिवस रात्र येत जात असतात
आणि उद्या ही उजाडत असतं,
आयुष्य ही सरकत असत पण
आठवणींच मडक मात्र भरत असतं...
दुःखाचे डोंगर नेहमी वाढत असतात
सुख त्याच्या पायथ्याशीच थांबलेलं असतं,
कराव मन कोणाशीतरी हलकं तर तेही
सांगत असतात आयुष्य हे असच असतं...
