आनंद तरंग, आनंद तरंग.....
आनंद तरंग, आनंद तरंग.....
1 min
22.9K
माझ्यासाठी तू,
निष्प्राण देहातील, जीवनाची चेतना,
माझ्यासाठी तू,
घनदाट तिमिरातील, आशेचा एकमेव प्रज्वलित दीप,
माझ्यासाठी तू,
थांबलेल्या लेखणीची, आंतरिक प्रेरणा,
माझ्यासाठी तू,
बेसूर जीवनातील, कृष्णाच्या बसुरीची फुंकर,
माझ्यासाठी तू,
बंदिवान स्त्रियांचा, तारणहार सखा कृष्ण,
माझ्यासाठी तू,
जीवनाच्या पुस्तकातील, वाचत रहावसं वाटणारा अध्याय,
माझ्यासाठी तू,
थकलेल्या मनाला, आधाराचा भक्कम खांदा,
माझ्यासाठी तू,
अथांग गूढ गहिऱ्या डोहातील, आनंद तरंग, आनंद तरंग.....
