STORYMIRROR

विवेक जोशी

Others

3  

विवेक जोशी

Others

आम्ही लढलो, आम्ही जिंकलो

आम्ही लढलो, आम्ही जिंकलो

1 min
274

थरार सामन्यांचा रात्रंदिनी षटकरीती बॅटा चेंडू गगनी

हे निशाण विजयाचे उंच उंचावित गेलो

एकदिलाने प्राणपणाने त्वेषाने गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षणाने लढलो ।।१।।


पंचप्राण करूनी गोळा स्वप्न विजयाचे पाहत होतो

विजयी होत राहिलो, भिडत राहिलो, लढत राहिलो

जल्लोषाने नारे देत राहिलो अजिंक्य विजयासाठी

यज्ञात क्रिकेटच्या तल्लीन मन झालो

आम्ही लढलो क्रिकेट जगलो विजयी झालो ।।२।।


होते स्वप्नविजयचे रणदूंदूभी जय हो जय हो चे

 मन उधाणले स्टेडियम प्रसन्न प्रकाशले

 विकेट, चौकार ,षटकर हेची आमुचे देव 

पाहून जल्लोष बेभान झालो

चढले स्फुरण आम्हा त्वेषाने चौकार षटकारे उल्हासलो 

प्रेक्षक प्रेक्षक आम्ही संघांचे पाठीराखे 

चिअरबालांच्या तालावर धुंदफुंद नाचलो

 दोन्ही संघ जय विजयी मैदानी भिडलो, आम्ही लढलो...।।३।।    


Rate this content
Log in