STORYMIRROR

Madhuri Dayma

Others

3  

Madhuri Dayma

Others

आजची स्त्री

आजची स्त्री

1 min
250

आजची स्त्री आता

नाही कुठेही मागे

सगळ्यांना सांगते

तुम्ही व्हा आता जागे...


पूर्वी म्हणत होते

आम्हाला अबला

आता बनलो आहोत

आम्ही देखील सबला...


खूप सोसले अन्याय

तेव्हा नव्हती शक्ती

आजची स्त्री म्हणते

मीच आहे करती धरती...


जिजाऊ, सवित्रीपासून

घेतले आम्ही शिक्षण

म्हणून आजची स्त्री म्हणते

करु आम्ही आमचे रक्षण...


आजची स्त्री आहे

काली, दुर्गा, नवनारी

तीच पडेल एकटी

संपूर्ण जगावर भारी....


Rate this content
Log in