आजची स्त्री
आजची स्त्री
1 min
491
आजची स्त्री आता
नाही कुठेही मागे
सगळ्यांना सांगते
तुम्हीही व्हा आता जागे...
पूर्वी म्हणत होते
आम्हाला अबला
आता बनलो आहोत
आम्ही देखील सबला...
खूप सोसले अन्याय
तेव्हा नव्हती शक्ती
आजची स्त्री म्हणते
मीच आहे करती धरती...
जिजाऊ, सावित्रीपासून
घेतले आम्ही शिक्षण
म्हणूनच आजची स्त्री म्हणते
करु आम्ही आमचे रक्षण...
आजची स्त्री आहे
काली, दुर्गा, नवनारी
तीच पडेल एकमेव
संपूर्ण जगतावर भारी
