आई
आई

1 min

11.3K
आई म्हणजे आपली ईश्वर!
तिचे अनंत उपकार!!
करते आपले प्रत्येक स्वप्न साकार!
तिला माझा साष्टांग नमस्कार!!
श्वासासम जपे लेकरू उदरी !
सदैव असते मायेची शिदोरी!!
पहिली गुरू असता,दुर्लक्षिते लक्ष चुका!
प्रेमरूपी ज्ञानाने तू घडविते घडा!!
सागरासम विशाल मन तुझे!
आयुष्यभर ओढते संसाराचे ओझे!!
मुलांसाठी करते, सर्व काही!
म्हणते माझे सर्वस्व , तुमची स्वप्ने!!
नित्य स्मरे तुझी अंगाई!
किती महती सांगु तुझी आई!!
अपुर्ण पडेल, आकाशमय पान, समुद्राची शाई!
तुच तुज सम आई!!!