आई
आई
1 min
233
मायेनं ओथंबलेली धार
मांगल्याचे सार
मातृत्वाची पुकार
जीवनाचा अमुल्य अलंकार
आई प्रेमाचं विस्तृत रान
तान्हुल्याची तहान
संस्काराची खाण
ती असते संसाराची शान
आई तृप्त आत्माची ढेकर
उघड्या भाळावरचा पदर
अनवाणी पावलांचीफुंकर
अनाथाच्या मनीच काहुर
दुःखभरल्या हुंदक्याची वाट
सौख्याची अतुट रेशीम गाठ
संसार समृद्धीची पहाट
थंड पाण्याने भरलेला माठ
मायेचा भरगच्च हात
राबणाऱ्या बापाची साथ
तेवणाऱ्या समईची वात
दुःखावरची हुकमी मात
तीच आंब्याचा मोहोर
तीच गुलमोहोराचा बहर
तीच खरी वात्सल्य चकोर
तीच आहे न संपणार माहेर.
