आई
आई
1 min
189
संगे तू असता आई
मी विश्वविक्रमी,
सदाचिया शौर्यवान
असे पराक्रमी.
दिला मज जन्म
संस्कार शिदोरी,
असे मी भाग्यवान
वाढले तव उदरी.
स्वामी तिन्ही जगी
आईविना दीन,
चरणाशी तुझ्या
होते आई लीन.
हृदयाच्या कुपीतले
आशिर्वाद मज लाभले,
त्याच प्रेरणेने प्रेरित मी
भाव माझे मांडले.
