Shilpa Dange
Literary Captain
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

25
Posts
1
Followers
0
Following

I'm Shilpa and I love to read StoryMirror contents.

Share with friends

तू समोर असताना वेदनांना पूर येतो डोळ्यात तुझ्या बघतांना आसवांना धीर येतो रेशमी स्पर्श तुझा जखमांवरही सुगंध उधळतो जेव्हा तू माझा हात अलगद हातात घेतो... -शिल्पा डांगे

रम्य सकाळी पारीजात ओंजळी माझ्या श्वासांवरचाही ताबा सुटतो त्या वेळी मग स्पंदनांना उलगडतच उधळतात सुगंध माझ्या कवितांमधल्या ओळी

सोडावी ही जगरहाटी कधी निवांत बसावे समुद्राकाठी तिथे नसावे सखेसोबती कधीतरी जगावे एकटेच स्वत:साठी -शिल्पा डांगे

माझ्या प्रत्तेक श्वासावर तुझ्याच नावाचे तरंग असावे. .. तुझ्याशिवाय माझे आयुष्य बेरंग असावे... -शिल्पा डांगे

कोंडलेल्या भावनांचे वादळ मनाच्या किनार्‍यावर घुटमळत असतात शब्दांच्या गर्दीत उधाणलेल्या आठवणींचे क्षण लेखणी शोधत असतात... -शिल्पा डांगे

जीवन एक अवघड प्रवास आहे तरीही ते जगण्याचा प्रत्येकाला हव्यास आहे माझ्यासाठी तुझं असणं खास आहे कारण मनाच्या कप्यात फक्त तुझाच वास आहे -शिल्पा डांगे

प्रवाह आटत गेला तरिही पावसाळा बाकी आहे.. डोळ्यांमधल्या अश्रूंचा उमाळा बाकी आहे... तुझ्यासोबत बरेच उन्हाळे सोसायला.. माझ्यात अमाप जिव्हाळा बाकी आहे.. -शिल्पा डांगे

तुझी मिठी म्हणजे ऊन्हात सावलीचा भास.. स्पंदनांचं मिलन व्हावं एकत्र येऊन तुझा-माझा श्वास.. -शिल्पा डांगे

विरहच जर प्रेमाचा शेवट असेल तर वचनांवर विश्वास कसला प्रेम शेवटी प्रेमच असतं त्यात कमी अन् जास्त हिशोब कसला -शिल्पा डांगे


Feed

Library

Write

Notification
Profile