Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#21 Days 21 Experiences

SEE WINNERS

Share with friends

21 दिवस भारत लॉकडाऊनमध्ये आहे!!!!! तथापि, आपण स्वप्नातही कधी अशाप्रकारच्या परिस्थितीचा सामना करु, असा विचार केलेला नसेल. घराभोवती आखलेली लक्ष्मणरेखा ओलांडून बाहेर न जाता हा काळ कसा घालवायचा, हा विचार करणेही अवघड आहे.

परंतु, शॉशंक रिडेम्प्शन चित्रपटातील एक संवाद नक्कीच आठवतो, तो म्हणजे ः तुरुंगात असताना मनावर ताबा मिळवण्यासाठी माणूस काहीही करत असेल.

पुढील 21 दिवसांत तुम्हाला तुमच्या सामान्य आणि व्यस्त दिनक्रमात अशक्य वाटणार्‍या अनेक बाबी पाहण्याची संधी नक्कीच मिळू शकते. स्टोरीमिररदेखील आपल्या या 21 दिवसांचे अनुभव रोजनिशी लिखाणाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणण्याची संधी देत आहे.

कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवून किंवा इतरांना प्रेरणादायी ठरेल असे काहीतरी नवीन, नाविन्यपूर्ण काम करून तुम्ही स्वत:ला कसे गुंतवले, याची रोजनिशी सर्वांना सांगा.


नियम:

  • तुम्ही तुमचा रोजचा अनुभव अनौपचारिक रोजनिशी लेखनाच्या रुपात सबमिट करणे आवश्यक आहे.
  • प्रिय रोजनिशीने सुरुवात करुन नंतर लेखन करायचे आहे.
  • तुम्ही तुमचे अनुभव कथा, कविता किंवा अगदी ऑडिओ स्वरूपातही सांगू शकता.
  • पुढील 21 दिवसांसाठी दररोज 1 लेखनसाहित्य तुम्ही सादर करायचे आहे, जेणेकरुन स्पर्धेच्या शेवटी तुमचे 21 अनुभव वा कथा सादर केलेल्या असतील.
  • स्टोरीमिररवर याआधी सादर केलेली कथा, कविता किंवा ऑडिओ पुन्हा सबिमट करु नये.
  • स्टोरीमिररचा निर्णय अंतिम आणि सर्व सहभागींना बंधनकारक असेल.
  • संपादकीय गुणांकन आणि वाचकांची पसंती, टिप्पण्या तसेच किती जणांनी साहित्य वाचले/ऐकले या आधारे शीर्ष साहित्य निवडले जाईल.


बक्षिसे:

  • सतत 21 दिवस 21 वेळा साहित्य सबमिट करणार्‍यांस स्टोरीमिररकडून विशेष प्रमाणपत्र प्राप्त होईल.
  • प्रत्येक भाषेतील शीर्षस्थ 3 विजेत्यांच्या साहित्याचे ई-बुक प्रकाशित करुन स्टोरीमिरर शॉपवर प्रामुख्याने दाखवले जाईल.
  • स्टोरीमिररच्या इव्हेंटमध्ये (ऑनलाइन/ऑफलाइन) विजेत्यांची नावे घोषित केली जातील.
  • 21 प्रविष्टी सादर केलेल्या सर्व लेखकांना 150/- रुपये किंमतीचे स्टोरीमिरर शॉप व्हाउचर मिळेल.
  • सर्वांसाठी सहभाग प्रमाणपत्र.



तारखा :25 मार्च 2020 ते 15 एप्रिल 2020


निकाल : मे 2020


भाषा : इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, ओडिया, बंगाली, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम


साहित्य प्रकार : कथा, कविता, ऑडिओ


संपर्क : neha@storymirror.com