STORYMIRROR

#31 Days : 31 Writing Prompts (Season 2)

विजेते पाहा

मित्रांशी सामायिक करा

परिचय :


दिलेल्या बॅनरमधील फोटो हा संबंधित दिवसाचा विषय असेल.


एक चित्राचे मोल हजार शब्दांइतके असते. - अनामिक


लेखन ही एक कला आहे. तुम्ही विचार करता त्यापेक्षा लेखन करणे सोपे आहे. विशेषतः त्यावेळी ज्यावेळी तुम्हाला कोणत्या विषयावर लिहायचे यासंबंधीची माहिती आधीच दिलेली असते.


स्टोरी मिरर पुन्हा घेऊन आले आहे 31 Days : 31 Writing Prompts (Season 2) - आपली सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती वाढवण्यासाठीची एक अनोखी लेखन स्पर्धा.


स्पर्धेचे नियम फारच सोपे असून तुम्हाला दिलेल्या बॅनरमधील फोटोच्या आधारे कथा किंवा कविता लिहायची आहे. तसेच लेखनाची शैली कशी असावी, हे तुम्हीच ठरवायचे आहे. जसे की, विनोदी, खुळचट, वन्य, सोपे. आपल्या कल्पनाशक्तीला मर्यादित करू नका तर तिला बहरु द्या आणि जे काही तुमच्या मनात येईल ते लिहा.


चला तर मग तयार व्हा. आपल्या कल्पनाशक्तीला चालना द्या आणि जगाला तुमच्या रंगात रंगवा. दररोज वेगळ्या विषयासाठी सज्ज व्हा आणि मनमोकळेपणाने लिहा.


स्पर्धेचे नियम :


स्टोरी मिरर रोज रात्री 12 वाजता नवीन लेखन विषय जाहीर करेल.

बॅनरमधील फोटो हा लेखनाचा विषय असेल.

प्रत्येक विषय स्पर्धेच्या शेवटच्या दिवसापर्यंत (1 जून) सक्रिय असेल. आपण Prompt टॅबमध्ये आधीचे विषय पाहू शकता.

स्पर्धकांनी त्यांच्या मूळ कविता/कथा सादर करणे अनिवार्य असेल.

कथा किंवा कवितांच्या संख्येवर मर्यादा नाही, आपण प्रत्येक विषयावर 1 किंवा त्यापेक्षा अधिक कथा/कविता लिहू शकता.

स्टोरी मिररचा निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांना बंधनकारक असेल.

लेख/निबंध सादर करण्यास परवानगी नाही.


बक्षिसे ः


प्रत्येक भाषेतील पहिल्या तीन विजेत्यांना स्टोरी मिररची गोल्ड, सिल्वर व ब्रॉन्झ सदस्यत्व मिळेल (http://sm-s.in/-G1SQZ2)

प्रत्येक विषयावर 31 दिवस दररोज लेखन करणार्‍या स्पर्धकांना 1500 रु. मुल्याच्या "Fiction Writing Course - Foundation" मध्ये मोफत प्रवेश मिळेल.

15 किंवा अधिक विषयांवर कथा/कविता सादर करणार्‍या सर्व स्पर्धकांना 150 रुपये किंमतीचे स्टोरी मिरर शॉप व्हाऊचर मिळेल.

सर्व सहभागी स्पर्धकांना स्टोरी मिररकडून सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.

संपादकीय गुण, वाचकांची पसंती संख्या, रेटिंग्ज आणि रचनेवरील टिप्पण्यांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.


पात्रता :


1 मे 2020 ते 1 जून 2020 या कालावधीत स्पर्धा घेतली जाईल.


निकाल : जुलै 2020


भाषा : इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, ओडिया आणि बंगाली


रचना प्रकार : कविता/कथा


संपर्क व्यक्ती : neha@storymirror.com


संपर्क क्रमांक - +91 8452804735