Pooja Yadavrao Bhange

Others


5.0  

Pooja Yadavrao Bhange

Others


"जीवन" - एक प्रवास !

"जीवन" - एक प्रवास !

1 min 1.4K 1 min 1.4K

आयुष्यभर सोबत असून

जवळ कधी बसत नाही

एकाच घरात राहून आम्ही

एकमेकास दिसत नाही



हरवला तो आपसातला

‌ जिव्हाळ्याचा संवाद

एकमेकांस दोष देऊन

‌. ‌‌‌ ‌‌‌‌. नित्य चाले वादविवाद



धाव धाव धावतो आहे

दिशा मात्र कळत नाही

हृदयाचे पाऊल कधी

हृदयाकडे वळत नाही



इतक‌ जगणं झालं पण

‌ ‌‌‌‌‌‌ जागायलाच वेळ नाही

‌. ‌‌‌‌‌‌‌. जगतो आहोत कशासाठी

‌. काहीच कसलाच मेळ नाही !



क्षण एक येईल असा

घेवून जाईल हा श्र्वास

अर्ध्यावरच थांबलेला असेल

हा जीवनाचा प्रवास !



अजूनही वेळ आहे

आनंदाने जगूया....

‌. सुंदर अशा या सृष्टीला

‌‌‌ डोळे भरून बघूया !


Rate this content
Originality
Flow
Language
Cover Design