Ratnadeep Kagade

Others


3  

Ratnadeep Kagade

Others


चूक कोणाची....???

चूक कोणाची....???

2 mins 9.5K 2 mins 9.5K

काल असच सुट्टी असल्यामुळे बाहेर पडलेले असताना अचानक कोणाचा तरी आवाज कानावर पडला.

थोडा ओळखीचा वाटला म्हणून मग मागे वळुन बघितलं तर काय ती माझ्या समोर.....

२ मिनिट मला सुचेना की आज इतक्या दिवसांनी का बरं..... अन् ते पण दुसरा कोणी सापडलं नाही मीच का??????

पण म्हणलं चल बोलू तरी ना....काय मणते ते

मनून मग विचारलं की कशी आहेस???

हे ऐकुन तिला असं पटापट काहीतरी सांगून टाकावं असं वाटलं पण ती मनातच बोलली असावी कारण तिच्या डोळ्यातलं पाणी सोडलं तर न रडण्याचा आवाज सोडून दुसरं काही दिसले नाहीच......

मग माझा मन मनला हिला शांत करायला पाजे मनून थोड जवळ गेलो, काय झाले नीट सांग आपन बघू काय जमल तर करू....

तिने मला फक्तं एकच प्रश्न विचारला...

"माझं काय चुकते का?????"

आता हे ऐकुन तुमचं जे झालं अगदी तसचं माझं झालेलं..... की हे मला का विचारात आहे.

मनून तिला नीट विचारलं अरे थोड समजून सांग काय झालं....???

ती डोळ्यातलं ते असाव पुसून बोलली -

हे सगळ तुम्ही लोकं करतात

"आंदोलने, रस्ताबंदी, जाळपोळ, मोर्चे...

जात, पंत, प्रांत, देश...

गरीब, श्रीमंत, उच्च, नीच...

मराठी, अमराठी, भैया, बिहारी...

हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई...

याचं आरक्षण, त्याचं हक्क,

आमचं कायदे, तुमचं कानुन.,

लाठी चार्ज, दगडफेक, गोळीबार...

पोलिस, मिल्ट्री, आंदोलक...

आत्महत्या, बलात्कार, रेप, चेडचाड...

मंदिर, मस्जिद, चर्च....

काळा, गोरा, शहरी, गावठी...

आस्तिक, नास्तिक, देव-धर्म...

मुलगा, मुलगी, अभिमान, स्वाभिमान...

बंद, बहिष्कार, एकी,भाववाढ...

राजकारण..."

मग या सगळ्यामध्ये माझं काय चुकलं र?????

खरं सांगायचं झालं तर खरंच मी काही क्षण हैराण झालेलो की खरंच यार हीचं काय चुकतंय...😢

हे सगळं तर आपण आपल्या स्वार्थासाठी च तर करतो ना.....

आणि हा ती कोण होती माहीत आहे...???

एका रस्त्याच्या कडेला पडलेली, अर्धी जळलेली, काचा फुटलेली.....

आपली बस, ST...😊

तिने मला एकच छोटासा प्रश्न विचारला पण अगदी अर्थपुर्ण होता तो...मला तरी त्याचं उत्तर अजून भेटल नाहीये...☹️

काही उत्तरं तुमच्याकडे असतील तर सांगता का???

"माझं काय चुकते??????"


Rate this content
Log in