Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Smita Murali

Others

3  

Smita Murali

Others

संसार

संसार

2 mins
2.0K


विठ्ठलवाडीची ही गोष्ट.मोहनराव साळे यांना एकुलती एक मुलगी व दोन मुले होते.मुलीचे नाव रेखा होते.मोहनरावांची ती लाडकी लेक होती.घरची परिस्थितीही चांगलीच होती. लहानपणा पासून मोहनरावांनी लाडाकोडात रेखाला वाढविले होते.राम व राजा या दोन भावंडासोबत रेखा लहानाची मोठी झाली आणि वडीलांनी केलेले लाड यामुळे रेखाला परिस्थितीची झळ काय असते याची फारशी कल्पना नव्हती.आई मिनाक्षी मात्र रेखाच्या वागण्याला बंधन घालत असे.ती रेखाला सारखी कर्तव्याची जाणिव करून द्यायची.प्रसंगी रागवायची व मोहनरावांचा विरोध सहन ही करायची.रेखाला कधी कधी आईचा खूप राग यायचा.

रेखा अभ्यासात खूप हूशार होती.मोहनरावांना तिच्या हुशारीचा अभिमान होता.पण मिनाक्षी मात्र चिंतेत असायची.तिचा अट्टाहास असे कि मुलीला अभ्यासाबरोबर घरकाम ही जमलं पाहिजे.मनात नसताना ही रेखाला थोडं घरकाम करावं लागे.पण घरकामात तिला खूप कंटाळा येई

आई पावलो पावली कानमंत्र देई.रेखा ते ऐकून न ऐकल्या सारखे करायची.आई म्हणायची,"अगं रेखे,तुला आता नाही समजायचं उद्या सासरी गेलीस कि पावलो पावली माझी आठवण येईल तुला"

मोहनराव लेकीला पाठीशी घालायचे.मी लग्नच करणार नाही असा रेखा हेका धरायची.असे म्हणता म्हणता रेखा उपवर झाली.अनेक चांगली स्थळं चालून आली.राकेश नावाच्या व्यावसायिकाशी तिचा थाटा माठात विवाह पार पडला.मोहनराव व मिनाक्षीची चिंता मिटली.लेक खात्या- पित्या सधन घरात लग्न करुन गेली.घरात प्रत्येक कामाला नोकर चाकर होते.रेखा माहेरपणाला आल्यावर आईला म्हणाली " बघ आई झालं ना सगळं चांगलं,उगीच मला तू रागवतं होतीस". आईनं पोरीला उराशी कवटाळंलं आणि म्हणाली" हो गं राणी,अशीच आनंदात सदैव नांद बाई.आईला आणखी काय हवं!"

पण काही दिवसातचं राकेशचा व्यवसाय डबघाईला आला.कर्ज भरमसाठ झालं.मोहनरावांनी ही शक्य तेवढी मदत केली.तरीही आर्थिक प्रश्न सुटेना.घरातल्या नोकरांना कामावरुन काढलं.आता रेखाची बिकट अवस्था झाली.राकेशचे प्रयत्न चालूच होते.अशा बिकट अवस्थेत रेखाला पदोपदी आईची आठवण येवु लागली.आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला.आई वडील काळजीत पडले.हळूहळू परिस्थितीनं रेखा सावरली.आईचे बोल आठवतं गेली.स्वतः खंबीर बनुन नवऱ्यालाही धीर देत गेली.

हिशोबानं तिखट मिठाचा संसार हसत हसत करायला शिकली.परिस्थितीनं नवे धडे गिरवू लागली.रेखा आई बनली.तिला गोंडस मुलगी झाली.आई वडीलांनी प्रसंगी धीर दिला.मुलीच्या पावलांनी वाईट वेळ टळली.एका कंपनीच्या सहकार्याने राकेशचा उद्योग जोमाने सुरु झाला.सुबत्ता परतली.पण रेखा मात्र हुरळून गेली नाही.मागचे दिवस विसरली नाही.संसाराचा पाठ अनुभवाने गिरवला व त्यात यशस्वी पण झाली.आई वडीलांना समाधान झाले.लेक खऱ्या अर्थाने संसारी बनली याचा पुर्ण घराण्याला अभिमान वाटला .

शेवटी काय, म्हणतातच ना माणसाने नेहमी परिस्थिती चे भान राखले पाहिजे.थोरा मोठ्यांचा सल्ला ऐकला पाहिजे.प्रत्येक जीवनावश्यक काम शिकलेच पाहिजे.हेच खरे आहे तर!!!


Rate this content
Log in