नशीब
नशीब
1 min
433
नशिबी का येते गरिबी
स्वप्नांची होते का स्थगिती
लाचारीत जगतो आता
बस कर माझ्या दाता...
गरिबीत आम्ही का उपाशी
राजकारणात पुढारी तुपाशी
नशिबाचा का असा मारा
होईल का मी उद्याचा सितारा
स्वप्नी बळ नाही आता...
स्वप्नांना ना कधी रे बळ
दुनियेत का माझाच छळ
यशाचा फुलेल का फवारा
भेटेल का मला तो दुलारा
स्वप्नी बळ नाही आता...
सत्कर्म केले मी अपार
विश्रांती ना घेत कधी दुपार
देवा तुझा भक्त मी वेळा
दुनिया म्हणते मी जगवेळा
स्वप्नी बळ नाही आता...
सत्कर्म केले मी अपार
विश्रांती ना घेत कधी दुपार
देवा तुझा भक्त मी वेगळा
दुनिया म्हणते मी जगावेगळा
स्वप्नी बळ नाही आता...
