भाषा प्रेम कविता
भाषा प्रेम कविता
1 min
334
हे मंदमंद पण प्रेम वाहते आमच्या माती
महाराष्ट्राचे धागे घेतले शिवरायांनी हाती.
अशीच आहे आमची आपुलकीची नाती
गर्व असे आम्हा जन्मल्यास मराठी माती.
आमच्या या मायेनं उजळल्या दिव्य ज्योती
तेज पसरले प्रशांत हृदयाच्या मंदिरी त्या राती.
महाराष्ट्राच्या त्या सम्पूर्ण बोलींच्या अंधारात
लावूया मराठी मातेची दिव्य अशी फुलवात.
महाराष्ट्र राज्यात चहूं कडे मराठीची असावी भ्रांती
हिंदी, इंग्रजी, इतर घालवूनी करूया थोडी क्रांती.
