सोहळा विठुरायाचा
सोहळा विठुरायाचा
1 min
670
गजर हरिनामाचा सोहळा विठुरायाचा
जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल
आषाढी कार्तिकी जावे पंढरीच्या वारी
टाळ मृदूंगाचा नाद वाजे भीमेच्या तीरी
जन्मभरीचा श्वास ध्यास विठ्ठलाचा
गजर हरिनामाचा सोहळा विठुरायाचा
जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल
गळ्यात तुळशीची माळ
मुखात अभंगाची ओळ
कपाळी अबीराचा टिळा
जमला वैष्णवांचा मेळा
गजर हरिनामाचा सोहळा विठुरायाचा
जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल
दिंडी चालली देवाजीच्या दारी
भक्ती जगली माणसाच्या उरी
घेऊनी आलो संचिताची शिदोरी
म्हणुनी जाहलो तुझा वारकरी
गजर हरिनामाचा सोहळा विठुरायाचा
जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल
खेळ चालला द्वैत अद्वैताचा
क्षय जाहला आस वासनांचा
चिरंजीव राहो जयघोष हरिनामाचा
गजर हरिनामाचा सोहळा विठुरायाचा
जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल