STORYMIRROR

Vishal Pathak

Others

4  

Vishal Pathak

Others

विरह

विरह

1 min
563

कोवळ्या सरींचा भार फार वाटला

मोगऱ्याचा सुगंध नकोसा वाटला

सोबतीस तु नसताना मात्र

निष्पर्ण वृक्षाचा आधार फार वाटला


सहवास होता नुसता की होते गडद काही

आता भावनेच्या रानात मनाला पायवाट नाही

होते दिवस ते आहेत दिवस हे

मिळूनी श्वास घेण्याचा काळ आता लोटला


पानावरील दवबिंदू होती कोणाची हृदये

खोडी झाली वाऱ्याची, अन् नशिबी विलग होणे

अजूनही पाऊस मला अंगणात बोलावतो

पण डोळ्यांवरील सुखाचा पडदा आता फाटला


स्वप्नांचे हिंदोळे बागेतील त्या आम्रवृक्षाला होते

भावनांना शब्दांचे आकार होते

अन् लयीला होते स्वरांचे सुगंध

असे गीत गाताना कंठ आज दाटला



Rate this content
Log in

More marathi poem from Vishal Pathak