कुठ शोधू आई मी तुला
कुठ शोधू आई मी तुला
1 min
252
कुठ कुठ शोधू मी
आई सांग ना तुला
प्रत्येक ठिकाणी आता
भास होतोय तुझा मला
मी जेवायला बसल्यावर
प्रेमाने मला वाढायची
मी जेवत असताना
लहानपणीच्या गोष्टी काढायची
मी शाळेला नकार दिल्यावर
हाणून मारून, बळजबरीने पाठवायची
मी रडत असल्यावर
स्वतःचा ऊर मात्र मनात दाटवायची
तुझ्या कुशीमध्ये मला
गाढ झोप लागायची
आज मात्र इच्छा नाही होत
तू नसताना जीवन जगायची
खूप सुन सुन झालय ग आई
जीवन माझं तू सोडून गेल्यान
सांग ना आई भेट होईल
ना आपली मी स्वर्गात आल्यान
