STORYMIRROR

Madhura Kulkarni

Others

5.0  

Madhura Kulkarni

Others

"ती"

"ती"

1 min
935


कितीदा लढावे झुगारुन दोऱ्या,

पुन्हा बांधतो तो तिला दावणीला

जपावी तिने लाज साऱ्या घराची,

नसे मात्र रक्षण तिच्या छावणीला!


जरी टोमण्यांनी सदा वार झाले,

तरी काम हाती, सदा मान खाली,

पळावे तरी सांग जाईल कोठे?

सर्वार्थ होते ग त्याच्या हवाली!


नभी उंच उडण्यास, आतुरते ती

पुन्हा लागते स्वप्न पंखांस कात्री

जरी आज असली तिला बंधने

ही तरी माळते स्वप्न आकाश नेत्री!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Madhura Kulkarni

"ती"

"ती"

1 min वाचा