गुलाबी स्पर्श
गुलाबी स्पर्श
1 min
374
तुझा स्पर्श होताच किती
खुलला होता तो गुलाब काय सांगू,
सखये तुझ्या केसात माळल्यानंतर
त्याचे खुललेले सौंदर्य कसे ग शब्दात मांडू?
लाली चढ़ली गुलाबी नेमकी
कुणाची कुणावर कसे गं शब्दात वर्णू?
मोहकता त्या गुलाबाची
तुझिया हातातून पाहता वाटे की सखये,
चल तोच तो संसाराचा डाव अपुला
पुन्हा नव्याने मांडू
