Nagesh Dhadve

Others

5.0  

Nagesh Dhadve

Others

वेळ 8.12 मुंबई(एक प्रवास)

वेळ 8.12 मुंबई(एक प्रवास)

3 mins
6.8K


8.12 मिनिटांची जलद लोकल थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म नंबर 1 वर येत आहे...अशी घोषणा होताच, नाग्या भाग!! असा कर्कश आवाज मागून आला. काही वेळासाठी हत्तबुद्ब् झालो,आणि तेथून पळ काढला. हा प्रवास माझ्या जीवनातला पहिलाच पण सर्व कामधंदे करणाऱ्यांसाठी नेहमीचाच. हा प्रवास जरा वेगळाच आहे पण आपल्या सर्वांच्या आयुष्यातील हा एक भाग आहे आणि कदाचित हा सर्वानीच अनुभवला असावा. नसेल अनुभवला तर तो मुंबईकर कसला?

असो.

प्लॅटफॉर्म वर पाहताच माझा जीव भांड्यात पडला. डोळ्यासमोर अंधार आला, असं वाटलं की तुर्कीस्तानाच्या युद्धामध्ये मलाच सामील केलं असावं..पण प्रवास करण गरजेच होत नाहीतर हरल्यागत तलवारी टाकून हार मानली असती आणि माघार घेतला असता पण इथे ते अशक्य होत.

स्वतःच्याच पायावर धोंडा टाकून घेतल्यागत झाले होते अन शेवटी त्या शेकडो प्रवाश्यांमधे मी सुद्धा शामिल झालो.

माझी मित्र मंडळी माझ्याकडे आश्चर्याने पाहत होती कारण त्यांचं प्रवास करण नेहमीचंच पण आज काहीतरी भयानक घडेल याची भीती मला सतावत होती..

सगळ्यांची नजर होती ती फक्त ट्रेन येणाऱ्या दिशेने. जसजशी ट्रेन जवळ येत होती त्याचप्रमाणे माझे हृदयाचे ठोके वाढत होते.

अखेरीस ज्याची वाट पाहत होतो ती वेळ आली आणि सर्वांची धाव पडली ती त्या ट्रेनवर. त्यात सर्व व्यक्तींचा समावेश होता, म्हातारी कोतारी,मुलंबाळ,बायका,पोर,असा सर्वांचा घोळ त्या ट्रेन पकडण्यात व्यस्त.

काही वेळासाठी वाईट वाटलं पण मुंबई मे रहना हे तो स्ट्रगल करना पडता है असं  ऐकलं होतं. कदाचित ते खरं असावं.

पण त्यांच्यात एक दिसून आलं की प्रत्येक जण आपल्या पोटापाण्यासाठी तिकडे उभे होते आणि आपल्या जीवाशी खेळायला सुद्धा तयार होते.

सर्वांची सीट अरेंजमेंट झाल्यावर मी आत चढलो आणि एका सीट समोर येऊन उभा राहिलो, अनेक प्रकारची मंडळी पाहायला मिळाली. कोणी पत्ते खेळत होती,कोणी गप्पा, काहीजण काकांची खेचत होते आणि त्यावर आलेला त्यांचा राग त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं, सेल्समेन एवढ्या गर्दीत सामान विकत होते तर साईबाबांची आरती करणारे भक्त मंडळी ढोलकीच्या नादावर नाचत होते. असा हा आगळा वेगळा प्रवास माझ्या आयुष्यात अनुभवायला मिळाला अन शेवटी ट्रेन सुटली.

बऱ्यापैकी लोकांनी पाय पडून स्वतःलाच नमस्कार केला आणि काकांनी जोरदार आवाज दिला, "गणपती बाप्पा मोरया" आणि मागून सर्व प्रवासी भक्तांची साथ.

ट्रेन तर सुरु झाली पण खरी गंमत तर पुढे होती.

४-५ किमी गेल्यानंतर अचानक कर्कश आवाज आला अन गाडीने जोरात ब्रेक दाबला. सर्वजण घाबरले आणि थोड्याचवेळात कळालं की वायर तुटल्यामुळे ४-५ तास उशिराने सुटेल

सर्वच घाबरले पण त्यानंतर मला माझ्या आयुष्यातला वेगळाच अनुभव शिकायला मिळाला. सर्व निराश न होता आपल्या गप्पांमध्ये व्यस्त राहिले जणू काही घरातले सदस्यच. त्यांच्याकडे निरखून पाहता ते प्रवासी कमी तर मित्रच जास्तच वाटत होते कारण तेथे कोणत्याच प्रकारचा धर्म, जात, गरीब-श्रीमंती,उच्च-नीच असा कोणताच भेदभाव नव्हता. होते ते सर्व भारतीय.

त्याच वेळेस मला भारतीय असल्याचा गर्व वाटला. समाजातले जातीभेद आपण पाहतो पण इथे होत ते काय?

8.12 हा प्रवास, माझ्यासाठी प्रवास नसावा तो असावा फक्त मुंबकर असल्याचा प्रेम, आनंद, एकी.

समाजामध्ये ज्याची कमतरता होती, ती या प्रवासाने भरून निघत होती. तो फक्त एक प्रवास नव्हता तर भारतीयांना एकत्र येण्याची जागाच म्हणावी लागेल.

असा प्रवास ज्याने मला दाखवून दिले मी भारतीय असल्याचे.

आणि कधी ते ३-४ तास ओलांडले ते कळच नाही. कारण हा प्रवास होता तो माझ्या मुंबईकरासोबत.

शेवटी ट्रेन सुटली आणि माझा प्रवास सुद्धा.


Rate this content
Log in