"थ्री किंग ऑफ ट्री"
"थ्री किंग ऑफ ट्री"


सुम्या.. टॉर्च चालू कर रे! काही दिसत बघ ना!
माझा दपकाच आवाज सुमीतच्या कानावर पडला. त्याने टॉर्च चालू केला तर खरं पण, त्या घनदाट अंधारात त्याचा काही उपयोग होईल असं वाटल नाही. पण अशी अंधारलेली भयानक परिस्थिती सुद्धा येईल; याच अजूनही नवल वाटत होतं!
कारण अशा काही घटना मी तर आज पर्यंत दूरदर्शन वर पहिल्या असाव्यात. असो.
तो अंधार आणि ते रात्रीचे २.००, एवढे शांततेत असावेत की घड्याळाची टिक टिक जी माझ्याच कानी पडत होती, ती सुद्धा मला धोक्याची सूचना बजावत असावी पण माझा मूर्खपणा तिथे नडला.
मित्रांचा झालेला तो अचानक प्लॅन आणि ती विचित्र घटना.बस्स!
माझ्या म्हंटल्याप्रमाणे आमच्या सुमीतबंधूनी टॉर्च लावला. खरं तर एवढ्या जंगलात, समोरच आमच्या मोठा सूचना फलक होता! आता, जंगल म्हटलं तर कसलं? हा प्रश्न पडावाच. हे जंगल होत ते "थ्री किंग ऑफ ट्री" या नावाने प्रसिद्ध असलेले गोवा राज्यातील. सर्वात हॉरर ठिकाण. असो. सूचना फलकामध्ये भल्या मोठ्या अक्षरात सूचना दिली होती. "हे स्थळ पर्यटनसाठी नसून येथे येण्यास सक्त मनाई आहे. येथे सैंटिफिकली काही अद्भूत गोष्टी प्रूव्ह झाल्या असून येथे प्रवेश करण्यास परवानगी नाही." - आदेशवरून
हे पाहताच माझा थरकाप उडाला आणि मी माघार घेण्याचा हट्ट त्यांच्या समोर धरला. लहानपणी जसे लहान मुलं आपल्या वडिलांकडे करतात अगदी तसंच.
मित्र माझी खिल्ली उडवण्यात दंग होते.आणि हीच गोष्ट मला खुणावत होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण त्यांच्या शिवाय मला माघार घेणं शक्यच नव्हतं. ते सुद्धा रात्री.
पुढे होती ती छोटीशी वाट. त्या चर्च मध्ये जाण्यासाठी. आणि त्याच्या मोठ्या दरवाजाला मोठा टाळा लावण्यात आला होता. जंगलाच्या चारी बाजूला अगदी घनदाट जंगल आणि ती वेळ; अगदी सिनेमा मधल्या सीन प्रमाणेच..
मी माझा अडथळा त्यांच्या समोर टाकतच होतो पण त्याचा असर त्यांच्यावर दिसून येत नव्हता.
गेटच्या डावीकडे एक छोटीशी पायवाट आढळली. आणि मग त्याचाच माग घेत आम्ही अखेरीस समोर चर्च आणि त्याच्या मागे स्मशानभूमीपर्यंत पोहोचलो. काही तरी घडणार या भितीने बावरा झाला होतो. अगदी सुचेनासे झाले होते
चर्च शोधेपर्यंत २.३० झाले. भला मोठा तो दरवाजा. आणि तिथे आम्ही पाचपांडव म्हंटल तरी हरकत नाही.
मला आत जाण्याची खरंच भीती वाटत होती कारण मला अशा ठिकाणी जाणं अजिबात आवडत नाही. पण तिथे माझ्या आवडीनावडी ला काही किंमतच नव्हती.
आत जरासा प्रकाश होता आणि मी त्या दिशेने वळलो. तीच चूक मी करून बसलो. पुढे सरकलो पण मागे पाहताच माझे पांडव मित्र नाहीसे होते. ही मस्करी होती की जादू हेच कळलं नाही. माझे मित्र माझ्यासोबत नाहीत हे कळताच माझ्या अंगावर काटा उभा राहिला, चित्रविचित्र विचार येऊ लागले. डोळ्यासमोरच्या चर्चमधल्या सावल्या सुद्धा मला खाऊ लागल्या.
४० किलो मिटर लांब अशा जंगलात माझं सुटका होणं खरं नव्हतं.
डोळ्यासमोर फक्त होती ती भीती, चेहऱ्यावर तो घाम आणि तो एकटेपणा.
एवढं होऊन मी आता स्वतःच डगमगलो. तो अंधार पाहून मी बिथरलो. त्या चर्च मध्ये माझ्या सावली शिवाय कोणी नव्हतं आणि मी तिला पण परका झालो. स्वतःच्या सावलीची सुद्धा भीती वाटू लागली. असं देवाच नावही कधी मुखी येत नाही, तिथे ३३ कोटी देव आठवू लागले..
हे होत निमित्त. मी न थांबता इकडे तिकडे वाट पाहू लागलो आणि तिथून एका रूम मध्ये येऊन पोहचलो. समोर पाहून माझी दातखिळीच बसली. तिथे त्या राजांची खुर्ची ठेवली होती आणि खिडकीतून सफेद असा उजेड त्या खुर्ची वर पडला होता.
हे पाहताच मी पळता पाय काढला आणि ओरडतच पळालो. बाहेर माझा मित्र सुमित मला शोधत होता.
त्याला पाहतच जिवातजीव आला अन त्याला भेटलो, ही आठवण माझ्या कायम आठवणीत रुजली.
भय हे काय असत हे आज जवळून पाहिलं, पण खरंच भय म्हंटल तर काय? भूत,प्रेत अथवा जखीण? फक्त या गोष्टीनेच भय वाटतं का?
भुतांची भिती वाटण्यापेक्षा आता मला आपल्या माणसाचीच भीती वाटू लागली आहे. भूतांपेक्षा भय त्यांचाच वाटत आहे कारण माणूस आता माणसात राहिलाच नाही. त्याची कृत्य पाहून माणूसही घाबरेल.
या मनुष्याच्या वस्तीत सुद्धा मी भुतांच्या वस्तीत जाऊन आलो.
भूत पहिला तर नाही पण त्या भीतीच्या जखमा अजूनही रुजल्या आहेत. आणि प्रत्येक क्षणी त्या मला आठवणी करून देतात