उषःकाल होता होता
उषःकाल होता होता
उषःकाल होता होता
काळरात्र झाली...
अरे पुन्हा अंधाराच्या
पेटवा मशाली....
'सिंहासन' चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं हे सुमधूर गीत. गीताचा गोडवा तर मनाला मोहित करतोच पण वीरश्री रसाने भरलेले हे गीत जगण्याला एक वेगळेच बळ देते..
काही दिवसांपूर्वीचा, म्हणण्यापेक्षा गेल्या वर्षीचा संपूर्ण काळ हा कोरोना महामारी मुळे अतिशय ताण- तणावाचा आणि संकटांचा गेला. या एका संकटा -
बरोबरच अनेक संकटे उभी ठाकली .जणू संकट मालिका सुरू झाली. आरोग्य, प्रशासन, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान,उद्योगधंदे, मजूर सर्वावरच या रोगाची काळी छाया पडली. 'जगणं आणि फक्त जगणं' हेच महत्त्वाचं होऊन बसलं.. या मानसिकतेतून कोणी सुटले नाही. राव- रंक, गरीब- आमिर, लहान -थोर, आबालवृद्ध अगदी सगळे या चरख्यात पिळून निघावे .
सगळे काही ठीक ठाक सुरू असताना कुणाच्याही ध्यानी - मनी नसताना ही परिस्थिती ओढवली.जणू काळरात्र झाली...
याच गाण्यात पुढे म्हटले आहे ..,.*उभा देश झाला एक बंदिशाला* अगदी तशीच अवस्था होऊन गेली. लॉक डाऊन मुळे सगळ्या जगाला टाळे लागले..अशा या बिकट काळात स्वतःला ,,परिवाराला सांभाळणे आणि त्याच बरोबरीने समाजउपयोगी जे जे काही करता येईल ते सर्वांनी केले,,विविध उपक्रम हाती घेतले,, आप आपल्या परीने देश उभारणीस हातभार लावला,,सरकारी नियमांचे काटेकोर पालन केले,,त्यामुळे आज आपण थोडा तरी मोकळा श्वास घेऊ शकतो,,पण अजूनही भय संपले नाही,,,पण शेवटी एकच लक्षात ठेवले पाहिजे..
असो संकटाचा कितीही अंधार
तरी जीवन उजळले पाहिजे
चिकाटी, यश,,आत्मविश्वास बळावर
मशाली सारखे पुन्हा झळकले पाहिजे...
